सभा तर शिवसेना प्रमुखांचीही मोठी व्हायची…आठवलेंचा आंबेडकर आणि ओवेसींना टोला

    

मुंबई: सभा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची देखील मोठी व्हायची पण मत मिळायची नाहीत, असे उदाहरण देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसीवर टीका केली. आठवले एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

आगामी लोकसभा, राज्यांतल्या विधानसभा व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका एकत्र लढण्याचा निर्णय आंबेडकर-ओवेसींनी घेतला आहे.

दरम्यान, भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्या औरंगाबाद येथील सभेवर रामदास आठवलेंनी निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीचा विशेष परिणाम होणार नसून त्याचा आम्हाला फायदाच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.