"गोरगरीब दीन दलितांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम खासदार असदुद्दीन ओवैसी करतात. 2019 ला त्यांच्या सोबतीला बाळासाहेब आंबेडकर असतील', असा विश्वास एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी औरंगाबादमधील सभेत बोलताना व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या सभेत बोलताना जलील म्हणाले, 2014 ला कौन आया रे कौन आया...शेर आया शेर आया.. अशी घोषणा देण्यात येत होती. 2019 ला घोषणा असेल कौन आये कौन आये...दो शेर आये दो शेर आये! बाळासाहेब आंबेडकर- असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्राचे राजकारण बदलून टाकतील. हे दोन्ही वाघ लोकसभेत जातील आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडतील.
0 comments:
Post a Comment