"ती"
चारचौघात बसलो तरी
ती मला न्हाळत होती,
अन्याय पदरात देवुन
ती माझ्याशी खेळत होती,
जन्मताच ती
माझ्यासोबत आली,
मी तिची
सोडत केली...
पहिलीत प्रवेश
घेताना सुद्धा आली,
अन आता नोकरी शोधताना
माझी सोबती झाली,
मी तिला सोडण्याचा
खुप प्रयत्न केला
कारण ती जात नव्हती
ती "जात "होती...
-राजकिशोर ससाणे
0 comments:
Post a Comment