• Twitter
  • Facebook
  • Google+
  • Instagram
  • Youtube

Wednesday 19 September 2018

युवा पँथर : एक झंझावात वादळ


युवा पँथर :एक झंझावात वादळ

अमेरिकेच्या ब्लॅक पँथरमुळे भारतामध्ये दलित पँथरचा जन्म झाला. 1972 पासून ते पाच वर्षे तुफान वादळासारखं दलित पँथर अन्यायाविरुद्धात भिडत राहीली. जातीवादीयांच्या मानगुटीवर पायावर देऊन तुडवत राहीली. आज दलित पँथरचं अस्तित्व कमि झालं तरी दलित पँथरचा प्रभाव म्हणुन महाराष्ट्रात काही संघटना स्थापन झाल्या...
त्यात नांदेडमध्ये युवा पँथर नावाची युवकांची लढवय्या संघटना राहुल प्रधान यांनी स्थापन केली. पुन्हा दलित पँथरचा जन्म नांदेडमध्ये झाला. आज ती युवा पँथर नावाने ओळखली जाते.
पँथर एस. एम. प्रधान यांचे सुपुत्र राहूल प्रधान यांनी युवा पँथर स्थापन करून दलित पँथरच्या पावलावर पाऊल ठेवुन सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा निर्माण केला. आणी युवकांना एकत्र आणण्याचं काम राहुल प्रधान हे करत असतात. नांदेड मधील आंबेडकर नगर मध्ये स्थापन झालेली युवा पँथर बघता बघता अख्या महाराष्ट्रात पसरत चालली आहे. दलित पँथरची स्टाईल, दलित पँथरचा बाणा, आणि आंबेडकरी चळवळ पुन्हा पाहायला मिळते.
युवा पँथरमधील प्रत्येक युवक हा नामदेव ढसाळ आहे, जे. व्ही. पवार आहे, राजा ढाले आहे. खरच आंबेडकरी चळवळीला खांदा देणारी संघटना युवा पँथरच आहे. प्रत्येक पँथर पेटतो आणि पेटवून देतो. अन्याय म्हटलं की युवा पँथरचं झंझावात वादळ पेटनारच. उद्रेक करुन आपला हक्क मिळवणारच.
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात युवा पँथरचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. खेड्यापाड्यातील युवक युवा पँथर हीच आपल्या अस्तित्वाची संघटना आहे म्हणुन ओळखतात. पँथर सारख्या खुप संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत पण युवा पँथर अशी एकच संघटना आहे जी दलित पँथरच्या पावलावर पाऊल ठेवून लढा लढत असते.
हक्क फक्त लढून आणि लढुनच मिळतात. हे युवा पँथरचं ब्रीदवाक्य आहे. कधीच न थांबणारं वादळ म्हणजेच युवा पँथर. शहरातील रस्त्यांना, गाड्यांना माहित आहे की युवा पँथरचं झंझावात वादळ कधीच थांबणार नाही. हेच वादळ महाराष्ट्र बंद मध्ये शहरातील रस्त्यांवर, गल्लोगल्लीमध्ये फिरत राहीलं. याच झंझावात वादळाची आज खुप आवश्यकता आहे म्हणून हजारो तरूण युवक युवा पँथरमध्ये प्रवेश करतात.
आजच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी युवा पँथरचा भाऊ युवा पँथर विद्यार्थी आघाडी सोबत असतेच. शिष्यवृत्ती घोटाळ्या विरोधात आंदोलन पुकारणारी संघटना म्हणजे युवा पँथर विद्यार्थी आघाडी हीच आहे...
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढाई लढणारी संघटना म्हणजेच युवा पँथर विद्यार्थी आघाडी संघटना आहे. सामाजिक समस्येबरोबर विद्यार्थी समस्या दुर करण्यासाठी युवा पँथरचं मोठं योगदान आहे...
पँथर राहुल प्रधान, पँथर अक्षय बनसोडे, पँथर अभिमान राऊत, पँथर प्रविण सुर्यवंशी, पँथर अरुणकुमार सुर्यवंशी, पँथर सम्राट आढाव, पँथर नितीन चौदंते, पँथर बाली कांबळे, पँथर किरण मस्के, पँथर रोमन खिल्लारे, पँथर दिनेश लोणे, पँथर अभिमन्यू पंडित, पँथर अपुर्व वाघमारे, पँथर जीवन लोणे हे सर्व युवा पँथरच्या झंझावात वादळातील संघर्ष करणारे पँथर्स आहेत...
दि. 20/04/2018 रोजी नांदेड येथे युवा पँथर कडुन असिफाच्या हक्कासाठी धरणे आंदोलन करायचं ठरवले होते पण नांदेड प्रशासनाने आंदोलनासाठी परवानगी दिली नाही. हे प्रशासन युवा पँथरला नेहमी भेत असते. हे सरकार युवा पँथरला नेहमी भेत असते... युवा पँथरचा दरारा कायम सारखा असतो.
दि. 10/04/2018 रोजी सचिन वालीया यांच्या हत्येच्या निषेधार्थ होणार्‍या नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
करण्यासाठी पोलीसांनी परवानगी दिली नाही. म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाले की "ये सरकार युवा पँथरसे डरती है पुलिस को आगे करती है "
युवा पँथर फक्त अन्याया विरोधात लढणारी असुन ती सर्वच कार्यात सहभागी असते...
बाबासाहेबांचे विचार माणसामाणसा मध्ये पेरण्यास सज्ज असते. गोरगरिब विद्यार्थीना वही पेन वाटप करत असते. एवढच नाही तर रक्तदान शिबीरे घेवुन जीवदान देत असते.
युवा पँथर वादळाला त्सुनामी व्हायची वेळ पडली नाही. नाहीतर युवा पँथर भारतात हाहाकार माजवल्या शिवाय शांत राहत नाही...
आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी युवा पँथर नेहमी सज्ज असते...
युवा पँथरच्या कार्यामुळे नांदेडला आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात पुन्हा नामदेव ढसाळ, राजा ढाले, जे. व्ही. पवार पाहायला मिळतात. प्रत्येक पँथर हा स्वाभिमानी असतो. म्हणुन पँथरचं झंझावात वादळ अख्ख्या महाराष्ट्रात पसरायला वेळ लागणार नाही. युवा पँथर एक झंझावात वादळ कधीच न थांबणारं न चुकणारं असं हे वादळ आंबेडकरी चळवळीसाठी महत्वाचे आहे. युवा पँथर मधील प्रत्येक पँथर हा विद्रोही असतो..
म्हणुन भारतात युवा पँथर पसरायला वेळ लागणार नाही...✍ राजकिशोर ससाणे

0 comments:

Post a Comment

Contact

Get in touch with me


Adress/Street

12 Street West Victoria 1234 Australia

Phone number

+(12) 3456 789

Website

www.johnsmith.com